सभासदत्व
महाराष्ट्र समाज, गांधीनगर चे सभासदत्व घेण्याचे सर्वसाधारण नियम खालीलप्रमाणे
१. मराठी भाषा बोलू शकणारा कोणताही व्यक्ती महाराष्ट्र समाज, गांधीनगरचा सभासद होऊ शकतो.
२. सभासदत्व दोन प्रकारे घेता येईल.
वार्षिक सभासद: यात रु. ३०० भरुन एका वर्षासाठी सभासदत्व मिळेल.
आजीव सभासद: यात रु.१५०० भरुन आजीवन सभासदत्व मिळेल.
३. सभासदत्व हे हस्तांतरणीय नाही
४. सभासदत्वसाठी भरलेल्या शुल्काचा परतावा कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही.
महाराष्ट्र समाज, गांधीनगर चे सभासद बनल्याने आपण
१. गांधीनगरमधील मराठी समाजाचा एक भाग बनू शकता.
२. महाराष्ट्र समाज, गांधीनगर ने आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात जसे संक्राती, शिवजयंती, गुढीपाडवा, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमा तसेच सहल किंवा स्नेहमेळावे अशा कार्यक्रमांत आपण सहभागी होऊ शकता.
३. लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धा- कार्यक्रम यांत आपली अपत्ये भाग घेऊ शकतात.
४. महाराष्ट्र समाज, गांधीनगर मार्फत चालवल्या जाणार्या वाचनालयाचा आपण लाभ घेऊ शकता.