प्रवृत्ती
समाजात साजरे करण्यात येणारे सण
मकरसंक्रांती-
या दिवशी समाजात सर्व सभासद बंधु भगिनींन साठी तिळगूळ समारंभ व महिलांसाठी हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम करण्यात येतो. खेळकुद स्पर्धेचे पण आयोजन करण्यात येते.
गजानन महाराज पालखी –
श्री गजानन महाराज मंदिर, त्रागड, अमदाबाद येथून महाराजांची पालखी महाराजांच्या प्रकट दिनाच्या १०-१५ दिवसा आगोदार समाज भवनांत आणण्यात येते. तिथे सर्व भक्तजन दर्शन, पूजा व आरती – प्रसादाचा लाभ घेतात.
शिवजयंती उत्सव –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रसंगानुरूप पोवाडा, शिव चारित्र व्याख्यान असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
गुढीपाडवा
या दिवशी पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा अर्चना करून तिला उभारण्यात येते. सांस्कृतिक कार्यक्रम व प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात येते.
आषाढी एकादशी
या दिवशी विठ्ठल रखुमाईंचे स्मरण करून भजन / कीर्तन / व्याख्यान असे कार्यक्रम करण्यात येतात.
श्री गणेशोत्सव
आपले आराध्य दैवत श्री गणेश याचा हा उत्सव गणेश चतुर्थी पासून सात दिवस समाज भवनांत उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात प्रतिदिन श्री गणेशाची पूजा – अर्चना, आरती, भजन, अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
विजयादशमी (दसरा)
या दिवशी सर्व समाज बंधु-भगिनींसाठी “सोने” लुटणे व प्रीती भोजनाचा कार्यक्रम करण्यात येतो. तसेच शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता पहिली ते कॉलेजचे शेवटचे वर्ष यातील ६०% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात येते.
मराठी भाषा परीक्षा व निबंध स्पर्धा
बृहन महाराष्ट्र मंडल नवी दिल्ली व राज्य मराठी भाषा विकास संस्थान तर्फे प्रायोजित मराठी भाषा परीक्षा व निबंध स्पर्धा बहुतांशाने २ ऑक्टोबर (गांधी जयंती) रोजी समाजभवनांवर घेण्यात येते.
समाज वर्धापन दिन
दिनांक ११ ऑक्टोबर रोजी समाजाचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येतो. या दिवसी श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. तसेच सर्वांसाठी चित्रकला व रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.
कोजागिरी पौर्णिमा
या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तसेच चित्रकला स्पर्धा रंगोली स्पर्धा व खेळकुद स्पर्धा यातील विजेते व विविध क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सभासद बंधुभगिनींना / कुटुंबीयांना पारितोषिक वितरण करण्यात येते. सोबत प्रीती भोजनाचे आयोजन पण असते.
वाचनालय
समाजातील सर्व वयोगटाच्या ग्रंथप्रेमींसाठी समाज भवनात छत्रपती शिवाजी वाचनालयाची सोय आहे. या वाचनालयात मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी या भाषांतील कथासंग्रह, कादंबऱ्या, नियतकालिके, बालसाहित्य उपलब्ध आहे. तरी अधिकाधिक वाचकांनी वाचनालयाचा आपल्या ज्ञानवर्धन तसेच मनोरंजनासाठी अवश्य उपयोग करावा व आपले मराठी भाषेशी नाते अधिक दृढ करावे.
प्रकाशन
महाराष्ट्र समाज गांधीनगर तर्फे मराठी भाषा संवर्धन व बृहन महाराष्ट्रातील नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्या करिता “संवाद” द्वैमासिकाचे प्रकाशन गेल्या सहा वर्षा पासून करण्यात येते. या उपक्रमांस राज्य मराठी विकास संस्था मुंबई, महाराष्ट्र यांच्या कडून पण आता अनुदान देण्यात येते. ज्या मुळे या प्रकाशन कार्यास चांगली दिशा व वेग मिळाला आहे.