गांधीनगर हे शहर गुजरात राज्याची राजधानी आहे. १९६० मध्ये भाषावार प्रांतरचनेत जुन्या मुंबई राज्याचे विभाजन करुन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये १ मे रोजी तयार करण्यात आली. त्यावेळी गुजरात राज्याची राजधानी साबरमती नदीच्या काठावरील अहमदाबाद शहरात बनवण्यात आली. भविष्यकाळात राजधानी म्हणून अहमदाबाद शहरावर येणारा ताण लक्षात घेऊन गुजरातची राजधानी अहमदाबादच्या बाहेर हलवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. साबरमती नदीच्या पश्चिम किनार्यावर असणार्या जुन्या पेथापूर संस्थानाच्या जागी गांधीनगर शहर वसविण्यात आले. त्यावेळी एच. के. मेवाडा आणि प्रकाश आपटे या दोन भारतीय नगर रचनाकारांवर या शहराच्या नियोजनाचे काम सोपवण्यात आले. या दोघांनी ख्यातनाम फ्रेंच वास्तुरचनाकार ल कर्बुझ्यीए यांना चंदिगढ शहराचे नियोजन करताना मदतनीस म्हणून काम केले होते. सुनियोजीत शहर म्हणून चंदिगढच्या ख्यातीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक हवामान व समाजव्यवस्था यांचा विचार करुन त्यांना साजेसे भारतीय रचनाबध्द शहर नियोजन करण्याची मोठी जबाबदारी या दोघा रचनाकारांवर सोपवण्यात आली.
महाराष्ट्र समाज गांधीनगर – जवळचे बस स्थानक, रेल्वे स्थानक व विमानतळ