श्री सिध्द्धिविनायक मंदिरातील कार्यक्रम
- प्रतिदिन सकाळी व सायंकाळी ७:०० वाजता श्री सिध्द्धिविनायकाची पूजा व आरती करण्यात येते.
- संकष्टी चतुर्थीला सायंकाळी सामूहिक अथर्वशीर्ष पठण व महाआरती करण्यात येते.
- माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेशजयंतीच्या दिवशी गणेशयाग करण्यात येतो तसेच श्री सिध्द्धिविनायकास छ्प्पण भोगाचा प्रसाद (अन्नकूट) केला जातो.
- माघ वद्य सप्तमीच्या दिवशी श्री सिध्द्धिविनायक मंदिराचा स्थापना दिवस उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी गणेशयाग व महाप्रसाद करण्यात येतो.