गांधीनगर – आकर्षक स्थळे

गांधीनगर विषयी

गांधीनगर हे शहर गुजरात राज्याची राजधानी आहे. १९६० मध्ये भाषावार प्रांतरचनेत जुन्या मुंबई राज्याचे विभाजन करुन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये १ मे रोजी तयार करण्यात आली. त्यावेळी गुजरात राज्याची राजधानी साबरमती नदीच्या काठावरील अहमदाबाद शहरात बनवण्यात आली. भविष्यकाळात राजधानी म्हणून अहमदाबाद शहरावर येणारा ताण लक्षात घेऊन गुजरातची राजधानी अहमदाबादच्या बाहेर हलवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. साबरमती नदीच्या पश्चिम किनार्‍यावर असणार्‍या जुन्या पेथापूर संस्थानाच्या जागी गांधीनगर शहर वसविण्यात आले. त्यावेळी एच. के. मेवाडा आणि प्रकाश आपटे या दोन भारतीय नगर रचनाकारांवर या शहराच्या नियोजनाचे काम सोपवण्यात आले. या दोघांनी ख्यातनाम फ्रेंच वास्तुरचनाकार ल कर्बुझ्यीए यांना चंदिगढ शहराचे नियोजन करताना मदतनीस म्हणून काम केले होते. सुनियोजीत शहर म्हणून चंदिगढच्या ख्यातीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक हवामान व समाजव्यवस्था यांचा विचार करुन त्यांना साजेसे भारतीय रचनाबध्द शहर नियोजन करण्याची मोठी जबाबदारी या दोघा रचनाकारांवर सोपवण्यात आली.

महाराष्ट्र समाज गांधीनगर – जवळचे बस स्थानक, रेल्वे स्थानक व विमानतळ

स्थळाचे नावअंतरस्थळाचे नावअंतर
सेक्टर २१/३० बस स्थानक१०० मीटरगांधीनगर केपीटल रेल्वे स्थानक५.६ किमी
गांधीनगर मुख्य बस स्थानक४.७ किमीअहमदाबाद रेल्वे स्थानक२७.४ किमी
अहमदाबाद मुख्य बस स्थानक३१.७ किमीसरदार वल्लभभाई पटेल विमानतळ२१ किमी

समाजभवन पासून जवळची आकर्षक स्थळे

स्थळाचे नावअंतरस्थळाचे नावअंतर
अक्षरधाम मंदिर गांधीनगर१.२ किमीगुजरात विधानसभा२.९ किमी
स्वर्णिम बाग३ किमीपुनित वन३.४ किमी
महात्मा मंदिर४.२ किमीसरिता उद्यान४.२ किमी
दांडी कुटीर५.५ किमीइंद्रोडा नॅचरल पार्क (प्राणीसंग्रहालय)७.४ किमी
गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल टेक सिटी (GIFT)१३.९ किमीअडालज पायरी विहीर१४ किमी
त्रिमंदिर अडालज१६.३ किमीमुख्य खरेदी केंद्र व मंडई०.१ किमी

गांधीनगर जवळची आकर्षक स्थळे

स्थळाचे नावअंतरस्थळाचे नावअंतर
वरदायिनी माता मंदिर (रुपाल)१३.३ किमीवैष्णो देवी मंदिर१८.५ किमी
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक२३.४ किमीसाबरमती आश्रम/महात्मा गांधींचे घर२४.१ किमी
हठी सिंह जैन मंदिर२५.५ किमीऑटो वर्ल्ड हेरिटेज कार म्युझियम२५.८ किमी
राणी रूपमतीची मशीद२६.७ किमीगुजरात सायन्स सिटी२७.९ किमी
हलणारे मिनार२८.१ किमीसिदी सैय्यद मशीद२८.५ किमी
साबरमती रिव्हरफ्रंट२९.२ किमीकांकरिया तलाव३०.४ किमी
महुडी जैन मंदिर३७.५ किमीअमरनाथ धाम मंदिर२०.५ किमी