श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती – २०२२

समाज कार्यक्रम

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती – २०२२

शनिवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम समाज भवनावर आयोजित करण्यात आला होता. दोन वर्षांच्या कालावधीनंतर होणार असलेला हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असल्यामुळे सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याप्रसंगी समाजाचे मुख्य विश्वस्त श्री सुधीरभाऊ विचारे, विश्वस्त श्री गोविंदभाऊ चौधरी, माजी विश्वस्त व समाजाचे जेष्ठ सभासद श्री बालाराम खांदारे आणि समाजाचे अध्यक्ष श्री सोमनाथ खांदारे हे व्यासपीठावर उपस्थित होते. समाजाचे विश्वस्त श्री दिवाकर चौकेकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच शिव छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. अध्यक्ष श्री सोमनाथ खांदारे यांनी यावेळी समयोचित मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमात कु तनिष्का जितेंद्र वाघ, श्री शरदराव वाघ तसेच श्री राहुल इंगोले यांची श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गुणगौरवपर भाषणे झाली. सौ करुणा चौकेकर यांनी सौ संध्या विजयशंकर बोर्डे लिखित ” माझ्या हृदयातील रायगड ” या स्वानुभवावर आधारित लेखाचे अभिवाचन केले तसेच कु अन्विता गिरीश वाघ हिने तानाजी – द अनसंग वाॅरिअर या चित्रपटातील मायभवानी या गीतावर नृत्य तर मोहित चिक्कोरडे याने शिव गर्जना सादर केली. सुमारे सव्वाशे सभासदांची उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन श्री दिवाकर चौकेकर यांनी केल्यानंतर उपस्थित सर्व सभासदांनी राष्ट्रगीताचे गायन केले. समाजाचे मुख्य विश्वस्त श्री सुधीरभाऊ विचारे यांचे हस्ते कार्यक्रमात भाग घेणारांना समाजातर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून रोख रक्कम बक्षीस स्वरुपात देऊन प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमाचे जिवंत प्रसारण फेसबुकवरुन देखील करण्यात आले होते. एकंदरीत हा कार्यक्रम उत्साहात तसेच आनंदात संपन्न झाला. यावेळी अल्पोपहाराचे आयोजन देखील करण्यात आला होते ज्याचा आनंद उपस्थित सभासदांनी घेतला.